‘देऊळ’ चित्रपटाविरोधात मुंबईत निदर्शन

November 4, 2011 5:03 PM0 commentsViews: 2

04 नोव्हेंबर

बहुचर्चित देऊळ हा सिनेमा आज रिलीज झाला. राज्यभरात जवळपास 400 स्क्रिन्स वर हा सिनेमा झळकतोय. पहिल्याच दिवशी सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. तर दुसरीकडे हिंदू जनजागृती समितीने देऊळमधल्या एका गाण्याला आक्षेप घेतला. या चित्रपटातल्या दत्तगुरूंचा उल्लेख असलेल्या ''दत्त…दत्त…'' या गाण्यावर हिंदू जनजागृती समितीने आक्षेप नोंदवलाय आणि विलेपार्लेच्या सन सिटी सिनेमाबाहेर निदर्शन केली. चित्रपटामध्ये दत्ताचे विडंबनात्मक गाणं चित्रित केल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केला. चित्रपटातल्या इतर कुठल्याही गोष्टीवर आक्षेप नसल्याचंही यावेळी हिंदू जन जागृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केलं.

close