दरवाढीचे पंतप्रधानांकडून समर्थन

November 4, 2011 5:16 PM0 commentsViews: 5

04 नोव्हेंबर

काल पेट्रोलच्या किंमतीत 1 रुपये 82 पैशांनी वाढ करण्यात आली. या दरवाढीचा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी समर्थन केलं. जी 20 परिषदेसाठी पंतप्रधान सध्या फ्रान्समध्ये आहेत. तिथे त्यांनी हे वक्तव्य दिलं.पंतप्रधान म्हणतात, इतर इंधनांच्या दरांवरचंही सरकारी नियंत्रण उठवण्याच्या दिशेनं पावलं टाकली पाहिजे. इंधनाच्या किंमती तेल कंपन्यांनीच ठरवाव्यात, हे सांगण्यात मला काहीच गैर वाटत नाही. दरम्यान, पेट्रोल दरवाढीविरोधात भुवनेश्वर आणि बनारसमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. हातात झेंडे घेऊन त्यांनी सरकार आणि दरवाढीविरोधात घोषणा दिल्या. गेल्या दहा महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत 23 टक्क्यांची वाढ झाली. तर गेल्या 2 महिन्यात अन्नधान्याच्या किंमतीत 5 टकक्यांची वाढ झाली. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये सरकारविरोधात संताप आहे.

close