सीरियाच्या बॉडीबिल्डरचा मृत्यू

November 5, 2011 3:21 PM0 commentsViews: 1

05 नोव्हेंबरमिस्टर युनिव्हर्स बॉडीबिल्डिंग स्पर्धेला आता केवळ एक दिवस राहिला आहे. 75 देशातील जवळपास 200 बॉडीबिल्डर्स या स्पर्धेसाठी मुंबईत आले आहे. पण ही स्पर्धा सुरु होण्याआधीच स्पर्धेला गालबोट लागलं आहे. शुक्रवारी या स्पर्धेत सहभागी होणार्‍या मोहम्मद अल-हदिदी या सिरीयाच्या बॉडीबिल्डरचा मृत्यू झाला आहे. तो 28 वर्षाचा होता. काल खेळाडूंचं वजन आणि फिटनेस पाहिला जात असताना हदिदी अचानक जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने मालाडच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. त्याला डिहायड्रेशन झाल्याचा अंदाज आहे. आणि त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. मुंबईत होत असलेल्या इतक्या मोठ्या स्पर्धेआधी ही घटना घडल्याने क्रीडाक्षेत्रात हळहळ व्यक्त होतेय, ही दुख:द घटना असल्याचे इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशनचे सचिव संजय मोरे यांनी म्हटलं आहे.

close