अण्णांच्या ‘राईट टू रिकॉल’ मागणीशी असहमत – अडवाणी

November 5, 2011 9:59 AM0 commentsViews: 6

05 नोव्हेंबर

अण्णा हजारे यांच्या राईट टू रिकॉल या मागणीशी आपण सहमत नाही असं विधान करुन लालकृष्ण अडवाणी यांनी राईट टू रिकॉल प्रश्नी भाजपची भूमिका मांडली. एवढ्या मोठ्या देशात राईट टू रिकॉल अर्थात अकार्यक्षम उमेदवारांना परत बोलावण्याच्या अधिकाराची अंमलबजावणी करणं शक्य नाही या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मताशी मी सहमत आहे असं अडवणी यांनी स्पष्ट केलं. तसेच भ्रष्टाचार, काळा पैसा आणि महागाईच्या मुद्यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी गप्प का आहेत ? त्यांनी या तीनही मुद्यांवर जनतेसमोर खुलासा करावा अशी मागणीही भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली. अडवाणींची जनचेतना यात्रा सध्या मुंबईत आहे. नुकतीच पत्रकार परिषद घेऊन अडवाणींनी आपली ही मतं मांडलीय.

close