कोल्हापूर 31 डिसेंबरपर्यंत अशांत म्हणून घोषित

November 5, 2011 11:33 AM0 commentsViews: 2

05 नोव्हेंबर

ऊस दर वाढीवरून उग्रं होत जाणारी आंदोलनं पाहता कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी 31 डिसेंबर पर्यंत जिल्हा अशांत घोषित केला आहे. त्याचबरोबर साखर कारखाना परिसरापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत आंदोलन करण्यावर जिल्हाधिकार्‍यांनी बंदी आदेश लागू केला आहे. ऊस दरवाढीसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ऊस दरवाढप्रश्नी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हिंसक आंदोलन सुरू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे बहुतांश साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. संघटनेकडून अशाच पध्दतीने आंदोलन सुरू राहिल्यास गंभीर परिस्थिती उद्भवू नये म्हणून 5 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण कोल्हापूर जिल्हा अशांत घोषित करण्यात आला.