नागपुरात 9 महिन्यात 90 खुनाच्या घटना

November 18, 2008 9:09 AM0 commentsViews: 1

18 नोव्हेंबर नागपूरप्रशांत कोरटकर नागपूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. आणि विकासाबरोबर शहरातील गुन्हेगारीचं प्रमाणही वाढतंय. गेल्या 9 महिन्यात खुनाच्या 90 घटना झाल्या आहेत. नागरिकांबरोबरच पोलीसही चिंतेत आहेत. नागपूर शहराचा औद्योगिक विकास कार्गो हबमुळे झपाट्याने होतोय. त्याच तुलनेत शहरात गुन्हेगारीही वाढत आहे.गेल्या दोनच महिन्यात नागपुरात खुनाच्या 30 घटना झाल्या आहेत. त्यामुळे इथले व्यावसायिक, उद्योजक चिंतेत आहेत. शहरातील इमामवाडा, अंबाझरी, जरीपटका आणि पाचपावलीत सर्वाधिक खुनाच्या घटना झाल्या आहेत. नागपूरचे सह पोलीस आयुक्त, बी.जे कंगाले सांगतात, ही गोष्ट खरी आहे की खुनाच्या संख्येत वाढ झाली आहे. नागपूरचे शहरातील व्यापारी पेठा, बँकांवर नेहमीच गुन्हेगारांचं लक्ष असतं. मागच्या वर्षात शहरात खुनाच्या 66 घटना झाल्या होत्या. त्या तुलनेत यावर्षीचे वाढलेलेआकडे नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

close