बॉडीबिल्डिंग स्पर्धेला आज सुरुवात

November 6, 2011 10:27 AM0 commentsViews: 5

06 नोव्हेंबर

क्रिकेटबरोबरच आज सगळ्यांना उत्सुकता आहे ती मिस्टर युनिव्हर्स बॉडीबिल्डिंग स्पर्धेच्या फायनलची. यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा मुंबईत होत आहे. संध्याकाळी चार वाजता फायनल सुरु होणार आहे. सिरियाच्या एका बॉडीबिल्डरचावजन पडताळणी दरम्यान दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. हा प्रकार दुर्देवी असला तरी फायनलची उत्सुकता कमी झाली नाही. आज एकूण 9 वजनी गटात ही स्पर्धा रंगणार आहे. आणि 54 बॉडीबिल्डर आपलं कसब पणाला लावणार आहे. भारताचा सुहास खामकर कालच्या वजन आणि फिटनेस पडताळणी दरम्यान मुख्य स्पर्धेसाठी अपात्र ठरला. त्यामुळे भारतीय टीमला धक्का बसला. पण आता सगळ्यांचं लक्ष आशिष साखरकरवर असेल. बक्षीस समारंभासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

close