राणेंविरोधातच काँग्रेस कार्यकर्त्यांनी थोपाटले दंड

November 6, 2011 1:08 PM0 commentsViews: 6

06 नोव्हेंबर

कोकणात पालिका निवडणुकांमध्ये नारायण राणेंसमोर स्वपक्षीयांचंच आव्हान आहे. काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना राणेंकडून डावललं जात असल्याचा आरोप होतोय. याविरोधात कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्गात मेळावासुद्धा घेतला. स्थानिक निवडणुकांमध्ये तिकीट वाटप आणि उमेदवार निवड प्रक्रियेत नारायण राणेंकडून काडीचीही किंमत मिळत नाही, असा आरोप सिंधुदुर्गातले काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते करत आहे. राणेंविरोधात या नाराज कार्यकर्त्यांनी मेळावासुद्धा घेतला. पण जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांची गटबाजी फक्त स्वार्थासाठी असल्याचे नारायण राणेंचं म्हणणं आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे मत व्यक्त केलं होतं. घरच्याच मतदारसंघात उघड झालेल्या या गटबाजीवर राणे काय तोडगा काढतात, याकडे आता लक्ष्य लागलं आहे.

close