…तर राज्यातला ऊस परराज्यात जाईल – शरद पवार

November 6, 2011 1:15 PM0 commentsViews: 5

06 नोव्हेंबर

राज्यात ऊस दरवाढीसाठी सुरु झालेलं आंदोलन हिंसक वळण घेतंल असताना या आंदोलनावर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी टीका केली. शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे शेतकरी इच्छा असतानासुद्धा ऊस कारखान्यात नेऊ शकत नाही. हे शेतकरी आता नाराज आहेत. ते आपला ऊस आंध्र प्रदेश आणि कर्नाटकसारख्या राज्यात नेतील, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आज राज्यभरात ऊस आंदोलकांनी बारामतीतल्या माळेगावजवळ ऊस वाहतूक करणार्‍या सहा गाड्यांचे टायर फोडले. माळेगावजवळच्या पंदेरे गावाजवळची ही घटना आहे. ऊस वाहतूक केली जाणार्‍या गाड्यांवर संघटनांचे कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. तर दुसरीकडे माळेगाव साखर लकारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली.

close