माझ्या विरोधात पक्षात षडयंत्र – राणे

November 6, 2011 2:16 PM0 commentsViews: 1

06 नोव्हेंबर

जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्गात घेतलेल्या मेळाव्यानंतर नारायण राणे यांनी आज दिवसभर सिंधुदुर्गातल्या अनेक जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि काँग्रेसमध्ये नवा जुना वाद हा जाणीवपूर्वक पेरला जात असल्याच जाहीर केलं आहे. माझ्या विरोधात पक्षामध्येच सुरू असलेल्या षडयंत्राचा हा भाग असून याला राज्य पातळीवरचा एक काँग्रेस नेताच जबाबदार असल्याचही राणे म्हणाले आहे. तसेच अशा प्रकारची जुन्या कार्यकर्त्यांची बैठक सिंधुदुर्गात पुन्हा होऊ देणार नसल्याचाही इशारा राणेंनी दिला.

कोकणात पालिका निवडणुकांच्या तोंडावर अलीकडेच काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना राणेंकडून डावललं जात असल्याचा आरोप होतोय. याविरोधात कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्गात मेळावासुद्धा घेतला. स्थानिक निवडणुकांमध्ये तिकीट वाटप आणि उमेदवार निवड प्रक्रियेत नारायण राणेंकडून काडीचीही किंमत मिळत नाही, असा आरोप सिंधुदुर्गातले काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते करत आहे. आज नारायण राणे यांनी दिवसभर जुन्या कार्यकर्त्यांची भेटी घेतल्या आणि पक्षातच षडयंत्र होतं असल्याचा आरोप केला. यातून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे असा आरोपही केला. या सर्व प्रकरणामागे काँग्रेसमधलाच एक मोठा नेता जबाबदार आहे असा गौप्यस्फोटही राणे यांनी केला.

close