विंडीज दिवसअखेर 256 धावा

November 6, 2011 3:49 PM0 commentsViews: 2

06 नोव्हेंबर

भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर पहिली टेस्ट मॅच रंगत आहे. टेस्टच्या पहिल्या दिवसअखेर विंडीजने पाच विकेट गमावत 256 रन केले आहे. शिवनारायण चंद्रपॉलची सेंच्युरी हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. टेस्टमधली त्याची ही 24 तर भारताविरुद्धची सातवी सेंच्युरी आहे. दिवसअखेर तो 111 रनवर नॉटआऊट आहे. चंद्रपॉल वगळता विंडिजचे इतर बॅट्समन भारताच्या स्पीन बॉलिंगसमोर गडगडले. पॉवेल, एडवर्ड्स आणि ब्राव्हो झटपट आऊट झाले. भारतातर्फे प्रग्यान ओझाने तीन तर अश्विनने दोन विकेट घेतल्या.

close