टेस्ट टीमध्ये जागा मिळवण्यासाठी युवराज आघाडीवर

November 18, 2008 12:23 PM0 commentsViews: 7

19 नोव्हेंबरक्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष श्रीकांत यांनी युवराज सिंगच्या वन डे मधल्या कामगिरीचं कौतुक करताना टेस्ट टीममध्येही त्याला संधी देण्याबबात सुतोवाच केलं आहे. सौरव गांगुलीच्या निवृत्तीमुळे टेस्ट टीममध्ये एक जागा रिकामी झाली आहे. आणि त्याजागी कोणाची निवड होणार याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पण इंग्लंड विरुद्ध सलग दोन मॅचमध्ये सेंच्युरी करून युवराजने निवड समितीचं लक्ष त्याच्याकडे वेधलं आहे.त्याशिवाय ऑलराउंड कामगिरी करताना त्याने काल चार विकेटही घेतल्या. टेस्ट टीममधल्या एका जागेच्या शर्यतीत युवराजसिंग सगळ्यात आघाडीवर असल्याचं श्रीकांत यांनी एका न्यूजपेपरशी बोलताना म्हटलंय. निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी युवराजच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असल्याचं म्हटलं होतं. इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित सीरिजसाठी भारतीय टीमची निवड येत्या गुरुवारी होणार आहे.

close