अब्दुल कलाम यांनी केलं कुंडानकुलम प्रकल्पाचे समर्थन

November 6, 2011 3:55 PM0 commentsViews: 5

06 नोव्हेंबर

तामिळनाडूमधल्या कुडानकुलम अणु प्रकल्पाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांनीसुद्धा समर्थन दिलंय. त्यांनी आज या प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पाच्या सुरक्षेवर पूर्णपणे समाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रकल्पासाठी थर्ड जनरेशन रिऍक्टर वापरले आहे. त्यामुळे सुनामी आली तरी त्याचा परिणाम होणार नाही, असं कलामांनी म्हटलं आहे. सरकारचा दूत म्हणून नाही तर एक शास्त्रज्ञ म्हणून आपण हे सांगत असल्याचंही त्यांनी सांगितलं. कुडानकुलममधल्या या प्रस्तावित अणु प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. त्याविरोधात जोरदार आंदोलनही सुरु आहे.

close