मणिपूरमध्ये नागा बंडखोरांचे आंदोलन सुरुच

November 6, 2011 4:05 PM0 commentsViews: 1

06 नोव्हेंबर

मणीपूरमध्ये सुरू असलेल्या बंदला आज 98 दिवस पूर्ण झाले. पण बंद संपण्याची आशा अजून दिसत नाही. संपूर्ण राज्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नॅशनल हायवे क्रमांक 37 वर ट्रकच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. या हायवेवर पूल तुटलाय तर इतर हायवे आंदोलनकर्त्यांनी बंद करुन ठेवले आहेत. त्यामुळे राज्यात इंधनाचा पुरवठा करण्यात अडचणी येत आहे. राज्य सरकार पर्यायी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतंय.

close