टगेगिरीने प्रश्न सोडवता येत नाहीत – राजू शेट्टी

November 7, 2011 9:26 AM0 commentsViews: 2

07 नोव्हेंबर

टगेगिरीने प्रश्न सुटत नाहीत तर ते चर्चेने सुटतात असा टोला राजू शेट्टी यांनी अजित पवारांना लगावला. बारामतीमध्ये दाखल होण्यापूर्वी राजू शेट्टींनी हा टोला लगावला. ऊस दरवाढीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली पदयात्रा सध्या काटेवाडीत आहे. थोड्याच वेळात ही पदयात्रा बारामतीत दाखल होणार आहे. या पदयात्रेत हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. काटेवाडीमध्ये राजू शेट्टींनी एक छोटेखानी सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, बारामतीतल्या शारदा प्रांगण या ठिकाणी स्वाभिमान शेतकरी संघटनेची आज चार वाजता सभा होणार आहे.दरम्यान आता या आंदोलनाचा फटका मुंबईला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मुंबईला जाणारे दुधाचे टँकर, भाजीपाल्याच्या गाड्या बंद करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.

close