टीम अण्णांची पुनर्रचना करणार – अण्णा हजारे

November 7, 2011 4:54 PM0 commentsViews: 1

07 नोव्हेंबर

टीम अण्णांचा पुनर्रचना केली जाणार नाही असं स्पष्ट सांगणारे अण्णा हजारे यांनी आता घूमजाव केला. टीम अण्णांची पुनर्रचना करणार असल्याचं आज स्वत: अण्णा हजारे यांनी सांगितलं. या नवीन टीममध्ये वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना आणि विशेषत: तरुणांना प्राध्यान्य देणार येईल,टीम अण्णांच्या कोअर कमिटीची पुनर्रचना करणं महत्त्वाचं आहे, पण त्याला किती दिवस लागतील हे महत्त्वाचे नसून टीममध्ये चांगली माणसं घेणं महत्त्वाचं आहे. पुनर्रचनेत वेगवेगळ्या स्तरातील आणि समाजातील लोकांना सहभागी करुन घेणार असल्याचे अण्णांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे या पुनर्रचनेत आदिवासी आणि मुस्लिम तरुणांना सहभागी करण्याचा प्रयत्न असले असंही अण्णांनी स्पष्ट केलं आहे. तसेच टीम अण्णांवर टीका करणार्‍यांना अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उत्तर दिलं आहे. ज्यांच्या हातातून सत्ता जाणार आहे, ज्यांचा खुराक बंद होणार आहे तेच लोक टीम अण्णांना तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.

close