महायुतीतून रिपाईच्या वाटयाला 22 जागा

November 7, 2011 2:50 PM0 commentsViews: 7

07 नोव्हेंबर

मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. याचसंदर्भात शिवशक्ती आणि भीमशक्ती जागावाटपाच्या बैठकीची पहिली फेरी आज पार पडली. शिवाजी पार्क येथे महापौर निवासस्थळी ही बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 22 जागा देण्यात आल्या आहे. तर अजूनही 8 ते 10 जागांवर रिपाईचा दावा आहे अशी माहिती मिळत आहे. तर पुढील बैठकांमध्ये रिपाईला अजून 2 ते 3 जागा मिळण्याची शक्यता दिसतं आहे. यानंतर महत्वाच्या जागांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे, रामदास आठवले आणि गोपिनाथ मुंडे आणि विनोद तावडे यांच्यात बैठक होणार आहे. आणि याबैठकीनंतरचं शेवटचे जागांचे आकडे समोर येणार आहेत.

close