डिसेंबरमध्ये ठाणे- नेरूळ लोकल सुरू होणार

November 18, 2008 12:28 PM0 commentsViews: 7

18 नोव्हेंबर, मुंबई ठाणे- नेरूळ या मार्गावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रेल्वे सेवा सुरू होणार आहे तसंच ठाणे- पनवेल ही रेल्वे सेवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेचे डेप्युटी रेल्वे मॅनेजर वेदप्रकाश यांनी दिली. ठाणे- पनवेल आणि वाशी या मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या पाहता भविष्यात या मार्गावर 12 डब्याची गाडी सुरू करावी, अशी मागणी खासदार आनंद परांजपे यांनी केली आहे. दरम्यान, प्रस्तावित ठाणे-नेरुळ या मार्गाची रेल्वे अधिकार्‍यांनी पाहणी केली आहे.

close