‘लोकपाल’साठी प्रणवदांची सरकारला विनंती

November 7, 2011 10:50 AM0 commentsViews: 1

07 नोव्हेंबर

येत्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक मंजूर झालं नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा अण्णा हजारेंनी दिला. त्यामुळे विधेयकाचा मसुदा स्थायी समितीत लवकर मंजूर होण्यासाठी आता सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. यासाठीच प्रणव मुखजीर्ंनी लोेकपालच्या मुद्यावर स्थायी समितीच्या बिगर काँग्रेसी सदस्यांची भेट घेतली आणि लोकपाल विधेयकाचा मसुदा हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी मंजूर करावा अशी विनंती केली. हा मसुदा संसदेकडे एक डिसेंबर नंतर पोहचणार होता. पण तो या महिन्यातच पोहचवावा अशी विनंती प्रणव मुखर्जी करत आहेत.

close