विदर्भातील कापूस शेतकरी हवालदिल

November 7, 2011 11:00 AM0 commentsViews: 11

07 नोव्हेंबर

पश्चिम महाराष्ट्रात एकीकडे ऊसासाठी आंदोलन पेटलं आहे तर विदर्भात कापूस उत्पादक शेतकरीसुद्धा हवालदिल झाला आहे. दिवाळी गेली तरी ही राज्य सरकारने अजूनही कापसाच्या खरेदीला सुरूवात केली नाही व्यापारी गावात पोहचून कापूस खरेदी करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी कापसाला बर्‍यापैकी भाव मिळाला पण यंदा सरकारने भावाची घोषणा न केल्यामुळे शेतकर्‍यांपुढे प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज हिंगणघाट येथे कापूस परिषद होत आहे.

close