स्वामी अग्निवेश करणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री

November 7, 2011 5:38 PM0 commentsViews: 4

07 नोव्हेंबर

सामाजिक कार्यकर्ते आणि टीम अण्णांशी ताटातूट झालेले स्वामी अग्निवेश आता बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. अण्णांच्या आंदोलनात सुरूवातील अग्निवेश यांचा समावेश होता. कालातंराने टीम त्यांनी टीम अण्णांवर टीका करून आंदोलनातून माघार घेत टीम अण्णांला रामराम ठोकला होता. उद्या स्वामी अग्निवेश यांनी 'वाईल्ड कार्ड' व्दारे बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. स्वामी अग्निवेश यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहे. त्यांच्या एका आंदोलनाच्या प्रचारासाठी त्यांनी बिग बॉसच्या घराच जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांचे सहकारी मनू सिंह यांनी सांगितले.

close