प्रगतीशील शेतकरी गणेश कुलकर्णी यांच्या हत्येचं गूढ कायम

November 8, 2011 10:00 AM0 commentsViews: 87

08 नोव्हेंबर

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या माढा या मतदार संघात राज्य शासनाने कृषी भूषण पुरस्काराने भूषवलेले शेतकरी गणेश कुलकर्णी यांची 15 दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली . माढ्यामधील प्रगतीशील शेतकरी गणेश कुलकर्णी यांच्या दोघा मारेक-यांना बेळगावमध्ये पकडण्यात पोलिसांना यश मिळालंय पण या प्रकरणाचा राजकीय सूत्रधार अजूनही मोकाट आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रोजच्या प्रमाणे पहाटे पायी फिरायला गेलेले गणेश कुलकर्णी घरी परत आलेच नाही.

गावापासून एक किलोमीटर अंतरावर रस्त्यात मृतदेह आढळला. त्यांच्या शरिरावर मारल्याच्या खुणा नसल्या तरी त्यांना फरफटत आणल्याच्या अनेक खुणा आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा माढा हा मतदारसंघ.आणि याच भागातला नवा राजकीय चेहरा म्हणून गणेश कुलकर्णी लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली होती. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही गणेश कुलकर्णी यांना यश मिळालं होतं.

शेती आणि राजकारण या दोन्हीही क्षेत्रात गणेश कुलकर्णी यांना यश होतं. एवढंच नाही तर शरद पवार यांच्या हस्ते कुलकणीर्ंना कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यातही आलं होतं. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कुलकर्णी हे प्रबळ दावेदार मानले जात होते. राजकीय स्पर्धेतून ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे.या प्रकरणात पोलिसांनी 8 संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

close