मध्यप्रदेशच्या निवडणुकीत साध्वीच प्रचाराचा मुख्य मुद्दा

November 18, 2008 12:34 PM0 commentsViews: 1

18 नोव्हेंबर, उज्जैन भूपेन्द्र चौबे मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकींवर साध्वी प्रज्ञासिंग प्रकरणाची गडद छाया दिसतेय. भारतीय जनता पक्षानं साध्वीला झालेली अटक हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवलेला आहे.उज्जैनमधील महाकाल मंदिर हे मध्यप्रदेशातील एक श्रद्धास्थान आहे. पण आता या मंदिराच्या आसपास साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हा चर्चेचा प्रमुख विषय आहे. कारण ती याच भागातली आहे.' हिंदू दहशतवादी असूच शकत नाही. प्रज्ञासिंगवरील आरोप सिद्ध झाले तर तिला हे करावं लागलं, याच्या मूळापर्यंत जावं लागतं ', असं संन्यासी आचार्य शेखर यांनी सांगितलं.संघपरिवाराचा वरचष्मा असल्यामुळे इथे हिंदुत्वाचा मुद्दा नेहमीच कळीचा ठरला आहे. पक्ष कोणताही असो कपाळावरचा टिळा आणि नर्मदेला वंदन या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भाजप या मुद्यावर आक्रमक होत असताना काँग्रेसनं मात्र सावध शांतता पाळलेली दिसतेय. या प्रकरणावर भारतीय जनशक्ती पार्टीच्या नेत्या उमा भारती म्हणाल्या की साध्वीच्या नार्को टेस्टमधून काहीच निष्पन्न झालं नाही. हे तिचं शारिरीक आणि मानसिक शोषण चाललं आहे.याला बीजेपीचं जबाबदार आहे. साध्वीची चौकशी अजून सुरुच आहे आणि तिच्याबाबत काय निकाल लागतो, हेही सगळ्या पक्षांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

close