हरिद्वारमध्ये चेंगराचेंगरीत 16 जणांचा मृत्यू

November 8, 2011 12:31 PM0 commentsViews: 5

08 नोव्हेंबर

हरिद्वारमध्येझालेल्या गायत्री कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीत 16 भाविकांचा मृत्यू झाला. तर 36 जण जखमी झाले आहे. शांतीकुंज आश्रममध्ये यज्ञ सुरू होते. त्यात भाग घेण्यासाठी आश्रममधल्या गेटवर भाविकांची गर्दी झाली. त्यामुळे ही चंेगराचेंगरी झाली. धार्मिक गुरू पंडित श्रीराम शर्मा यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त या यज्ञाचे आयोजन करण्यात आलं होतं. हा उत्सव 11 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यात 5 लाख भाविक येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

close