लवासाला संरक्षण देणं अयोग्य – अण्णा हजारे

November 8, 2011 12:48 PM0 commentsViews: 2

08 नोव्हेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहले. लवासाचा बचाव केल्याने अण्णा व्यथित झाले. आता फौजदारी खटला दाखल झाल्याने पर्यावरण खात्याने लवासाच्या पहिल्या टप्प्याल्या परवानगी द्यावी हे मुख्यमंत्र्यांच विधान दुर्देवी आहे असं अण्णांनी या पत्रात म्हटलं आहे. गुन्हा करणार्‍या कंपनीच्या विरोधात एकीकडे गुन्हा नोंदवीत असताना दुसरीकडे संरक्षण देण हे अयोग्यच आहे असंही अण्णांनी स्पष्ट केलं.

लवासा संदर्भात तीन महिन्यात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर लवासाच्या पहिल्या टप्प्याला परवानगी द्यावी असे विधान केल्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या शपथेचा भंग करणारे आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळानेे लवासावर फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यांचे दिवशीच मुख्यमंत्र्यांनी असे विधान करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान करणारे असल्याचे अण्णांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

close