येडियुरप्पा यांना अखेर जामीन

November 8, 2011 1:26 PM0 commentsViews: 2

08 नोव्हेंबर

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना अखेर आज जामीन मिळाला आहे. जमीन घोटाळाप्रकरणात त्यांना अटक झाली होती. जमीन घोटाळा प्रकरणात येडियुरप्पा दोषी असल्याचा अहवाल कर्नाटकच्या लोकायुक्तांनी दिला होता. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारसही लोकायुक्तांनी केली होती. त्यानंतर येडियुरप्पांच्या नावाने वॉरंट काढण्यात आलं. त्यावेळी पोलिसांना घरी सापडले नाहीत. पण नंतर थोड्याच वेळात ते स्वतः कोर्टात शरण आले होते. त्यानंतर ते आजपर्यंत जेलमध्येच होते. येडियुरप्पांना आज दोन वेगवेगळ्या प्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला.

close