गणेश कुलकर्णी हत्येप्रकरणी मुख्य सुत्रधार मोकाट !

November 9, 2011 10:53 AM0 commentsViews: 6

09 नोव्हेंबर

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या माढा या मतदारसंघात प्रगतीशील शेतकरी गणेश कुलकर्णी यांची 15 दिवसांपूर्वी हत्या झाली होती. त्यांच्या दोघा मारेकर्‍यांना बेळगावमध्ये पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पण या प्रकरणाचा राजकीय सुत्रधार अजूनही मोकाट आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. 15 दिवसांपूर्वी रोजच्या प्रमाणे पहाटे पायी फिरायला गेलेले गणेश कुलकर्णी घरी परतलेच नाहीत. गावापासून एक किलोमीटर अंतरावर रस्त्याजवळ त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा नाहीत. पण त्यांना फरफटत आणल्याच्या अनेक खुणा आहेत. राजकीय स्पर्धेतून ही हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणात पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. त्यातला संदीप पाटील हा मुख्य आरोपी आहे.

close