सेन्सेक्स 300 अंशांनी कोसळला

November 18, 2008 1:14 PM0 commentsViews: 4

18 नोव्हेंबर, मुंबई शेअर मार्केटमध्ये शेअर्सच्या किमती दिवसेंदिवस कोसळत आहेत. आजही भारतीय शेअर मार्केटनं असाच धक्का खाल्लाय. सेन्सेक्स तब्बल 300 अंशांनी कोसळत 8 हजार 937 च्या स्तरावर बंद झाला आणि निफ्टी 116 अंशानी घसरत 2 हजार 683 च्या स्तरावर बंद झाला. नफेखोरीच्या फटक्यातून आज कोणताही सेक्टर बचावलेला नाही. टॉप लूजर्समध्ये आज विप्रो, एनटीपीसी, एसीसी आणि टीसीएस हे शेअर्स होते तर टॉप गेनर्समध्ये फक्त रॅनबॅक्सी कंपनीचा शेअर्स दिसला .

close