राजू शेट्टींची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट

November 9, 2011 11:19 AM0 commentsViews: 2

09 नोव्हेंबर

कृषी मंत्री शरद पवार यांच्या गावी बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींच्या आंदोलनाची दखल घेत अखेर शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण शेतकर्‍यांनी शांततेत आंदोलन करावे अशी विनंतीही सुप्रिया सुळे यांनी केली. लवकरात लवकर व्यवहार्य तोडगा काढण्याचे आश्वासनही सुप्रिया सुळे यांनी दिले.

close