राजू शेट्टींवर गुन्हा दाखल

November 9, 2011 5:42 PM0 commentsViews: 3

09 नोव्हेंबर

बारामतीमध्ये राजू शेट्टींनी सुरु केलेलं उपोषण हे कुठल्याही परवानगीशिवाय सुरु केल्याचे सांगत त्यांच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बारामती पोलिसांनी नगर परिषदेच्या तक्रारीवरुन हे तीन गुन्हे दाखल केले आहे. राजू शेट्टींनी मैदानाजवळच्या शाळेचा विनापरवानगी उपोषणासाठी वापर केल्याची तक्रार करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनीही कारवाई केली. दरम्यान ऊसदरवाढीसाठी राजू शेट्टींनी सुरु केलेल्या उपोषणाचा त्यांचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, आज सुरु असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या ऊसाच्या प्रश्नावर काय चर्चा होते आणि त्यावर काय तोडगा काढला जातो हे देखील महत्त्वाचं असणार आहे.

close