राणे-जाधव यांच्या कार्यकर्त्यांचा धुमाकूळ सुरूच

November 8, 2011 5:03 PM0 commentsViews: 2

08 नोव्हेंबर

भास्कर जाधव आणि नारायण राणे या कोकणातल्या दोन मंत्र्यांमधील वाद अधिकच चिघळत चालला आहे. आज नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. कुडाळ शहरातून निघालेल्या या प्रतिकात्मक प्रेतयात्रेत 200 ते 300 कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुसरीकडे भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी मालवणमध्ये नारायण राणेंचा पुतळा जाळला.

दरम्यान, राणेंच्या समर्थकांनी काल चिपळूणमध्ये जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर आज भास्कर जाधव यांनी या कार्यालयाची पाहणी केली. तसेच पुन्हा एकदा राणेंना आव्हान दिलं. भास्कर जाधव यांना संपवण राणेंना जमणार नाही, त्यासाठी राणेंना दुसरा जन्म घ्यावा लागेल असं आव्हानच त्यांनी दिलं. काल अज्ञात लोकांनी जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केली. या तोडफोडीत 25 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नारायण राणे आणि भास्कर जाधव यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा वचक नाही, असा टोला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंनी लगावला.

close