केवळ भाषणामुळे भ्रष्टाचार थांबणार नाही – सोनिया गांधी

November 9, 2011 9:38 AM0 commentsViews: 9

09 नोव्हेंबर

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अण्णा हजारे यांच्यावर पहिल्यांदाच तोफ डागली. केवळ भाषण करून भ्रष्टाचार संपणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. उत्तराखंडमध्ये सोनियांची सभा होती. पण शेवटच्या क्षणी सोनियांनी आपला दौरा रद्द केला. त्यामुळे सभेत त्यांचं भाषण संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी वाचून दाखवलं. या भाषणात सोनिया गांधी म्हणाल्यात, भाषणबाजी करून भ्रष्टाचाराविरुद्ध लढता येणार नाही. लोकपाल विधेयक आणण्यासाठी पंतप्रधान आणि सरकार कटिबद्ध आहेत. आरटीआय सारखा कायदा कुणी आणला ? असा सवालही सोनिया यांनी उपस्थित केला. लोकपालचा मुद्दा मी विचारात घेतला आहे अशी ग्वाही पण सोनिया यांनी दिली.

close