लेखी आश्वासन द्या तरच आंदोलन मागे – शेट्टी

November 9, 2011 9:45 AM0 commentsViews: 2

09 नोव्हेंबर

ठोस लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार राजू शेट्टी यांनी केला. सरकारने लेखी आश्वासन द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. ऊस दराबाबत आज सकाळी मंत्रिमंडळाची बैठक झाली. राजू शेट्टींनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं होतं. त्यानंतर चर्चा होईल असंही सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं. पण त्यावर आधी ठोस आश्वासन द्या मगच आंदोलन मागे घेऊ अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारने राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील आणि शरद जोशी यांना निमंत्रण दिलं. पुण्यात ही बैठक होणार आहे.

close