अकोल्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात 3 वर्षाच्या हर्षलचा अंत

November 18, 2008 1:37 PM0 commentsViews: 6

19 नोव्हेंबर अकोलाबालदिनाच्या दिवशी एका तीन वर्षाच्या मुलाला दरोडेखोरांनी चाकूनं भोसकून मारल्याची घटना अकोला शहरात घडली आहे. हर्षल चंदन असं या दुर्देवी मुलाचं नाव आहे. अकोल्यामध्ये भर संध्याकाळी गणेश चंदन यांच्या घरात दरोडेखोर घुसले. हर्षलची आई चंचल चंदन यांनी या दरोडेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्न करताच त्यांनी हर्षलवर चाकूनं वार केले आणि पळून गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या हर्षलला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. पण काल त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांच्या अकार्यक्षमतेविरोधात हर्षलच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत त्याचा मृतदेह पोलीस ठाण्यातच ठेवला आणि दरोडेखोरांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांना बांगडया भेट दिल्या. आणि पोलीस स्टेशनच्या काचाही फोडल्या. दरम्यान पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.

close