ठाण्यात निवडणुकाच्या तोंडावर युतीत फूट ?

November 9, 2011 4:08 PM0 commentsViews:

09 नोव्हेंबर

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप आणि आरपीआय अशी महायुती झाली असताना ठाण्यात मात्र शिवसेना – भाजप युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून कोणताच प्रतिसाद येत नसल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यामध्ये 130 पैकी 60 ते 65 जागा भाजप लढवणार आहे. यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार हे स्थानिक नेत्यांना देण्यात आले. यासंदर्भात कामाला लागण्याचे कार्यकर्त्यांनाही आदेश देण्यात आले आहे. तर आता ठाण्यात भाजपची मनसेशीही युतीबाबत चर्चा होण्याची बातमी मिळते आहे.

close