अमूल दूध विक्रेत्यांचा दूध बंदचा निर्णय

November 9, 2011 4:17 PM0 commentsViews: 2

09 नोव्हेंबर

अमूल दूध विक्रेत्यांनी उद्यापासून ठाणे, मुंबई, नवी मुंबई , पनवेलमध्ये दुध विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या भागात अमूल दुधाच्या विक्रीवर परिणाम होणार आहे. दुधाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पण विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली नाही. याच्या निषेधार्थ उद्यापासून अनिश्चित काळासाठी दूध विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

close