येत्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार ?

November 10, 2011 9:17 AM0 commentsViews: 7

10 नोव्हेंबर

आगामी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काही अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर काँग्रेसश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली. मुंबई, ठाणे आणि नाशिक या महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची काँग्रेसची इच्छा आहे. पण इतर महापालिकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागली आहे. कालच्या प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे. तिकडे राष्ट्रवादीनंही काँग्रेसला उत्तर दिलं आहे. आघाडी लवकर व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण आम्ही लाचार नाही. टाळी दोन्ही हातांनी वाजली पाहिजे, असं मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. काँग्रेसबरोबरच्या आघाडीचा निर्णय 15 दिवसांत होणं आवश्यक आहे असंही पटेल यांनी म्हटलं आहे.

close