चंद्रपुरात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार

November 10, 2011 10:12 AM0 commentsViews: 6

10 नोव्हेंबर

चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारुबंदी करण्यासाठी पोरामिता गोस्वामी यांच्या श्रमिक एल्गार या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आलं आहे. याच मुद्यावरुन त्यांनी चिमूर ते नागपूर अशी कष्टकरी महिलांची पदयात्रा काढली होती. याची दखल घेत चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली.

त्यानंतर समिती जो अहवाल देईल, त्यानंतरच जिल्ह्यात नवे दारु दुकानाचे परवाने दिली जातील अशी भूमिका राज्य सरकारने घेतली. परंतु, हा अहवाल येण्यापूर्वीच उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी 11 नव्या दारु दुकानांना परवानगी दिलीय. यातले सगळ्यात जास्त परवाने राष्ट्रवादीच्या लोकांनाच दिल्याचा आरोप करत हे परवाने रद्द करावेत यासाठी एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.

close