कसाबला फाशी द्या !-पाकिस्तान

November 10, 2011 10:28 AM0 commentsViews: 4

10 नोव्हेंबर

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या ताब्यात असलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला फाशी दिली पाहिजे अशी मागणी पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी केली. या हल्ल्यात कसाबचे जे साथीदार आहेत त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे अशी ठाम भुमिका मलिक यांनी मांडली. तसेच समझौता एक्सप्रेसमध्ये स्फोट घडवणार्‍यांनाही शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी रेहमान मलिक यांनी केली.

सार्क परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांची भेट झाली. ही चर्चा सकारात्मक होती. पण याच चर्चेत दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानची दुटप्पी भूमिका उघड झाली. मुंबईवर हल्ला करणारा अजमल कसाब हा अतिरेकी आहे. त्याला फाशी झालीच पाहिजे, अशी भूमिका पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी मांडली. पण त्याचबरोबर जमात-उद-दावा या अतिरेकी संघटनेचा बचावही त्यांनी केला. 26/11च्या मुंबई हल्ल्यात जमात-उद-दावाचा हात असल्याचे कुठलेच पुरावे मिळालेले नाहीत, असं मलिक यांनी म्हटलं आहे. समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटातल्या दोषींना शिक्षा करण्याची मागणीही त्यांनी केली. तर 26/11च्या सूत्रधारांवर पाकिस्तानने कारवाई करावी अशी मागणी भारताने केली.

पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यात झालेल्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले,- 3 वर्षांपासून बंद असलेली द्विपक्षीय चर्चा पुन्हा सुरू करावी.- व्हिझा नियम लवकरात लवकर शिथिल करावे.- व्यापारविषयक करार करण्यासाठी पावलं उचलावी.- लाईन ऑफ कंट्रोल म्हणजेच एलओसी (LOC) वरुन काश्मीरमध्ये व्यापार आणि प्रवास करता यावा, यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध कराव्या

close