टेस्ट मॅचसाठी हरभजन बाहेरच !

November 10, 2011 11:08 AM0 commentsViews: 2

10 नोव्हेंबर

वेस्ट इंडीजविरुद्ध दिल्ली टेस्टमध्ये मिळवलेल्या विजयानंतर दुसर्‍या टेस्टसाठीही सध्याची टीम कायम ठेवण्यात आली आहे. निवड समितीने आज नवी दिल्लीत हा निर्णय घेतला. दुसरी टेस्ट सोमवारपासून कोलकात्याला होणार आहे. मात्र ही टेस्ट जिंकली आणि पर्यायाने सीरिज जिकली तर मात्र टीममध्ये नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निवड समितीचा विचार आहे. हरभजन सिंगला मात्र पुन्हा एकदा टीममधून बाहेर बसावं लागलं आहे. त्याच्याऐवजी टीममध्ये आलेल्या आर अश्विनने या टेस्टमध्ये नऊ विकेट घेतल्या. तर हरभजनला रणजी टेस्टमध्येही विकेट शिवाय रहावे लागले.

close