यशवंत देव यांचे 85 व्या वर्षात पदार्पणानिमित्त सन्मान

November 11, 2011 11:20 AM0 commentsViews: 2

11 नोव्हेंबर

महाराष्ट्राचे लाडके संगीतकार यशवंत देव यांनी 85व्या वर्षात पदार्पण केलं. त्या निमित्ताने देवघर या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. आशा भोसलेंच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि तसेच 85,000 रुपये देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आशाताईंचाही सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला रश्मी ठाकरे, अभिनेता सुबोध भावे, विठ्ठल कामत उपस्थित होते. कार्यक्रमात श्रीधर फडके, उत्तरा केळकर, मंदार आपटे या सर्वांनीच गाणी सादर केली.

close