‘तमाशा ते रंगभूमी’… आगळीवेगळी दिनदर्शिका

November 18, 2008 1:50 PM0 commentsViews: 1

18 नोव्हेंबर, उल्हासनगरउल्हासनगरमध्ये नुकतंच 'तमाशा ते रंगभूमी' या आगळ्यावेगळ्या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं. अण्णाभाऊ साठे विचार मंच या संस्थेन काढलेल्या या दिनदर्शिकेचं प्रकाशन ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांच्या हस्ते झालं.लोककला, साहित्याच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा घेतलेल्या शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक , विठाबाई नारायणगावकर यासारख्या 12 कलावंतांची चित्र आणि माहिती या दिनदर्शिकेत आहेत. यावेळी काही कलावंतांनी आपली कलाही सादर केली. यावेळी ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांनी त्यांना हा मान दिल्याबद्दल त्यांनी मंचाचे आभार मानले. "लोककलावंताचा इतिहास समाजमनापर्यंत पोहोचायला या दिनदर्शिकेच्या माध्यमातून हातभार लागणार आहे," असंही सुबल सरकार म्हणाले.

close