विदर्भातला ‘मास्टर ब्लास्टर';469 रन्स,70 फोर आणि 12 सिक्स!

November 11, 2011 12:04 PM0 commentsViews: 16

अखिलेश गणवीर, नागपूर

11 नोव्हेंबर

नागपूरमध्ये झालेल्या क्लब क्रिकेट स्पर्धेत एका नव्या रेकॉर्डची नोंद झाली. 16 वर्षाखालील स्पर्धेत नागपूरच्या पियुष फुलसुंगेने तब्बल 469 रन्स केलेत आणि आता त्याचे स्वप्न आहे ते भारतीय टीममध्ये खेळण्याचं.

विक्रमांचा बादशाह सचिन तेंडुलकर प्रत्येक युवा क्रिकेटरचा आयकॉन आहे. त्याच्यासारखंच खेळण्याचं त्यांचं स्वप्न असतं.असंच स्वप्न बाळगलंय, नागपूरच्या पियुष फुलसुंगेनं. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असणार्‍या पियुषने 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत नवा रेकॉर्ड केला. नागपूरच्या हिस्लोप कॉलेजमध्ये शिकणार्‍या पियुषने रेशिमबाग क्रिकेट क्लब विरुध्द झालेल्या मॅचमध्ये 469 रन्स केले आणि तेही फक्त 398 बॉलमध्ये. यात त्याने तब्बल 70 फोर आणि 12 सिक्सची बरसात केली.

पियुषच्या या आक्रमक बॅटिंगचे कौतुक सध्या सर्वत्र होतं आहे. आणि याचा अभिमान त्याच्या क्रिकेट क्लबलाही आहे. पण पियुषला इथंच थांबायचं नाही, क्रिकेटमध्येच त्याला आपलं करिअर करायचं आहे. आणि त्या दिशेने त्याने प्रवासही सुरु केला आहे. विदर्भातल्या उमेश यादवने आपल्या फास्ट बॉलिंगच्या जोरावर थेट भारतीय टीममध्ये जागा मिळवली. आता उमेशच्याच पावलावर पाऊल ठेवत पियुषही भारतीय टीममध्ये येण्यासाठी जोरदार प्रयत्न करतोय.

close