कारखानदार गब्बर झाले, उसाला योग्य भाव मिळालाच पाहिजे – राज ठाकरे

November 10, 2011 5:10 PM0 commentsViews: 6

10 नोव्हेंबर

साखर कारखानदार गब्बर झाले आहे त्यांच्यामुळे शेतकर्‍यांना फटका बसतोच त्याचबरोबर सरकारलाही फटका बसतो शेतकर्‍यांचे नुकसान, सरकारचे नुकसान होतेय मात्र एवढं होऊनही काँग्रेस, राष्ट्रवादीवाल्यांचे कारखानदार गब्बर झाले आहे. कारखाने आजारी पाडून हेच लोकं पैसे लाटणार हे वेळीच थांबलं पाहिजे या प्रश्नी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनीच लक्ष घालावे अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ऊसप्रश्नी सुरू असलेल्या राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. सहकार क्षेत्रातील उद्योगच डबघाईला कसे येतात असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.

राज्यभरात पेटलेल्या ऊस आंदोलनाचा वणवा दिवसेंदिवस वणवा वाढत चालला आहे. राजू शेट्टी यांनी ऊसाला पहिला हप्ता 2,350 रुपये द्यावे या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून बारामतीत उपोषण सुरु आहे. मध्यंतरी मनसेच्या आमदारांनी बारामतीत जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. आज राज यांनी आपल्या निवासस्थानी कुष्णकुंज येथे पत्रकार परिषद घेऊन शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत साखर कारखानदारांचा समाचार घेतला. राज म्हणतात, साखर कारखानदारांच्या धोरणामुळे शेतकर्‍यांना फटका बसतोच त्याचबरोबर सरकारलाही फटका बसतो शेतकर्‍यांचे नुकसान, सरकारचे नुकसान होते मात्र एवढं होऊनही काँग्रेस,राष्ट्रवादीवाल्यांचे कारखानदार गब्बर झाले आहे. कारखाने आजारी पाडून हेच लोकं पैसे लाटणार हे वेळीच थांबलं पाहिजे या प्रश्नी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनीच लक्ष घालावे अशी मागणी राज यांनी केली.

राजू शेट्टी यांचे आंदोलन राजकीय हेतूने होतं आहे असा आरोप होत आहे असा प्रश्न राज यांना विचारला असता राज म्हणाले की, राजू शेट्टी यांचे आंदोलन राजकीय हेतूने असते तर शेतकर्‍यांना रस्त्यावर येण्याची काय गरज आहे. या सर्वांना हे सहकार क्षेत्र मोडून खासगीकरण करायचं आहे आणि हे उद्योगधंदे आपल्याच ताब्यात ठेवायची आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच यावर पुन्हा अजितदादा म्हणतील 'यांना काय कळतेय शेतातलं' असा टोलाही अजितदादांना राज यांनी लगावला. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला माझा आणि पक्षांचा याला पाठिंबा आहे, ऊस आंदोलकांना माझी एकच विनंती आहे आंदोलनाला हिंसक वळण लागू देऊ नका तसेच शेतकरी हा आपल्या घरातला आहे आणि हे एक संपूर्ण कुटुंब आहे असा विचार करून शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे असं आवाहनही राज यांनी केलं.

close