गणेश कुलकर्णी यांची हत्या राजकारणातून ?

November 10, 2011 4:56 PM0 commentsViews: 22

प्रवीण सकपाळ, सोलापूर

10 नोव्हेंबर

माढ्यामधल्या उपळाईचे उपसरपंच आणि कृषीभूषण गणेश कुलकर्णी यांच्या हत्येच गूढ अजून कायम आहे. राजकारणातूच त्यांची हत्या झाल्याची चर्चा आहे. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचा सहभाग आहे असा थेट आरोप शिंदे यांचे राजकीय विरोधक संजय पाटील भीमानगरकर आणि भारत पाटील यांनी केला.

माढ्यामधील प्रगतीशील शेतकरी गणेश कुलकर्णी यांच्या हत्येचं गूढ अजूनही कायम आहे. गणेश कुलकर्णी पहाटे फिरायला गेले असताना त्यांचा खून झाला. गावापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. ही हत्या पूर्व नियोजित होती असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. या प्रकरणात माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात येतोय. या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप पाटील हा बबन शिंदेंच्या मुलाचा मेव्हणा आहे. असं असताना आपला या खुनाशी संबंध नाही, असं बबन शिंदे कसं काय म्हणू शकतात हा सवाल त्यांच्या विरोधकांनी केला.

गणेश कुलकर्णी यांच्या हत्येपूर्वी तीन वर्षं आधी माढ्यामध्ये माळी समाजातील हणमंत आतकर यांचाही अशाच पद्धतीने खून करण्यात आला होता. या प्रकरणात गणेश घुगे आणि आरोपींना अटक झालीय तर हनुमंत कळसाइत फरार आहे. हे हत्या प्रकरण लपून राहिल्यामुळेच गणेश कुलकणीर्ंची हत्या झाली, असा आरोप गणेश कुलकणीर्ंच्या कार्यकर्त्यांनी केला.

गणेश कुलकर्णी हत्या प्रकरणात राजकीय कट असल्याचा पोलिसांचंही म्हणणं आहे. त्यामुळेच या या प्रकरणाचा राजकीय सूत्रधार शोधून काढाला, अशी मागणी स्थानिक लोक करत आहे.

close