‘ऑक्सिजन … जीव गुदमरतोय’ प्रदर्शनाच्या वाटेवर

November 18, 2008 1:52 PM0 commentsViews: 17

18 नोव्हेंबर, मुंबई रचना सकपाळमराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट होत आहेत. मराठीतल्या हिट सिनेमांच्या जंत्रीत आणखी एका नावाची भर पडणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'ऑक्सिजन … जीव गुदमरतोय'. निर्माती नीता देवकर यांचा हा मराठी सिनेमा आहे. 'हिरवं कुंकू', 'शंभू माझा नवसा'चा हे दोन हिट सिनेमे दिल्यानंतर निर्मात्या नीता देवकर यांची 'ऑक्सिजन … जीव गुदमरतोय' ही तिसरी कलाकृती आहे. 'ऑक्सिजन- जीव गुदमरतोय' मध्ये एका साध्या निष्पाप मुलीनं मन खंबीर करून समाजातल्या दुष्ट प्रवृत्तींविरूद्ध दिलेल्या लढ्याची कथा मांडली आहे. सिनेमात सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, संदीप कुलकर्णी, चारूशीला साबळे-वाच्छानी अशी भलीमोठी स्टारकास्ट आहे. माझ्या दोन सिनेमांपेक्षा हाही सिनेमा लोकांना आवडेल, असं निर्माती नीता देवकर ठामपणे म्हणाल्या.

close