ऊस दरवाढ आंदोलन पेटले

November 11, 2011 9:20 AM0 commentsViews: 12

11 – 11 – 11

ऊस दरवाढीवर गेल्या 16 दिवासांपासून सुरु असलेले आंदोलनं दिवसेंदिवस पेट घेत आहे. बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शे्‌ट्टी यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस उजाडला तरी ऊस दरवाढीवर कोणताही तोडगा निघाला नाही. आज सोळाव्या दिवशी राज्यभरात काही शेतकर्‍यांनी राडा घातला. काही वेळापूर्वी प्रादेशिक साखर सह संचालक कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घुसले.आणि फर्नीचरची तोडफोड केली. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यात सांगली- नांदरे रोडवर शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला.

आंदोलकांना पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी पोलिसांवरच दगडफेक केली. तर तिकडे कोल्हापूरमध्ये शिरोळ तालुक्यातल्या नंादणी आणि हरोली दरम्यानच्या रस्त्यांवर संतप्त शेतकर्‍यांनी बस पेटवून दिली. काल रात्री उशीराची ही घटना आहे. रात्री पुण्यात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही असं वृत्त आलं आणि शेतकर्‍यांनी घोषणाबाजी करत बस पेटवून दिली. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मनसेनं आज पुण्यातल्या साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकर्‍यांच्या ऊसाला योग्य भाव देण्याची मागणी करत मनसेचे आमदार प्रविण दरेकर यांनी येथील साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण यांना निवेदन दिलं.

दरम्यान, सरकारनं शेतकर्‍यांचा आता अंत पाहु नये, साडे अकरा रिकव्हरी धरून 2200 रूपये भाव दिला पाहिजे असं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. ऊसाचा दर ठरवण्यासाठी सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये थोड्याच वेळात चर्चेची चौथी फेरी सुरु होणार आहे. पुण्यातल्या साखर संकुलात ही बैठक होणार आहे. काल झालेली चर्चा फिसकटल्यामुळे आज पुन्हा ही चर्चा होणार आहे.ऊसाला कमाल 2250 ते किमान 2200 पर्यंत दर स्विकारण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी दाखवली होती पण आज काही ठोस तोडगा निघेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close