साहेब, ‘चुल पेटवायची कशी’ ऊसतोड मजुरांचा सवाल

November 11, 2011 11:13 AM0 commentsViews: 24

11 नोव्हेंबर

ऊस दरवाढीसाठी शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा वणवा पेटला आहे. गेल्या सोळा दिवसांपासून शेतकर्‍यांनी आंदोलन छेडले आहे. मात्र शेतकरी संघटना आणि सरकार यांच्या दरम्यान कोणताही तोडगा निघत नाही. या आंदोलनामुळे ऊस तोडणी कामगारांना महिन्याभरापासून रोजगार नाही. त्यामुळे आंदोलन लांबलं तर चुल पेटवायची कशी असा सवाल ऊस तोडणी करणारे मजुर विचारतात. शेतकरी चाराही देत नसल्याने या मजुरांच्या गुरांचीही उपासमार होतेय. असंच वातावरण राहिलं, तर आम्ही घरी परत जाऊ असंही या ऊस तोडणी कामगारांनी म्हणणं आहे.

close