‘लोकपाल’चे 5 विभाग करण्याचा सरकारचा डाव – केजरीवाल

November 13, 2011 8:58 AM0 commentsViews: 2

13 नोव्हेंबर

लोकपाल बिलाचे पाच विभागात विभाजन करून सरकार लोकपाल बिलाला कमकुमत करणार असल्याचा सरकारच डाव आहे असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. लोकपाल विधेयकाच्या प्रश्नी केजरीवाल आणि प्रशांत भुषण हे टीम अण्णांचे महत्वाचे सहकारी आज राळेगणमध्ये अण्णांशी चर्चा करत आहेत. न्यायपालिका, नागरिकांची सनद, यांच्यासाठी वेगळे कायदे, सीबीआयला लोकपालाच्या कक्षेतून वगळणं अशा प्रकारचे कायदे सरकार करत असल्याचंही केजरीवाल यांनी सांगितलं. दरम्यान, लोकपाल बिलाच्या पाच तुकड्‌यांबाबत आपण आपण सहकार्‍यांसोबत चर्चा करुन मग काय ते ठरवू असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

close