‘किंगफिशर’ला आर्थिक टेकू देण्यासाठी पंतप्रधानांचा पुढाकार ?

November 13, 2011 9:07 AM0 commentsViews: 3

13 नोव्हेंबर

देशातील दुसरी सर्वात मोठी हवाई वाहतूक कंपनी असलेल्या किंगफिशर एअरलाईंसची काळजी आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही लागली आहे. किंगफिशरला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. याविषयी पंतप्रधान अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. किंगफिशरला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी आधीच सांगितलं होतं. शनिवारीसुद्धा किंगफिशरची मुंबईतून 9 उड्डाणं रद्द करण्यात आली. तर देशभरात 40 फ्लाईट्स रद्द झाल्यात.

close